Sunday, September 15, 2024
HomeLuxury brand productशरद पवार यांची काँग्रेस, ठाकरे गटापासून वेगळी वाट, गौतम अदानी यांचे कौतुक...

शरद पवार यांची काँग्रेस, ठाकरे गटापासून वेगळी वाट, गौतम अदानी यांचे कौतुक…

ncp chief Sharad Pawar Gautam Adani | काँग्रेस आणि शिवसेने कडून प्रसिद्ध उद्योगपती गौतम आदनी यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. शरद पवार यांनी गौतम आदनी यांचे पुन्हा कौतुक केले. गौतम आदनी यांनी धन्यवादही दिले आहे.

images 1

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे प्रणते म्हटले जातात. महाविकास आघाडीचे दोन पक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात सातत्याने भूमिका घेत आहे. परंतु अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीत बिघाडी आहे. राहुल गांधी उद्योगपती गौतम आदनी यांच्यावर सातत्याने कठोर टीका करत असतात. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीकरांसाठी आदानी यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गौतम आदनी यांच्यासोबत आहे. यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. आता शनिवारी बारामतीत शरद पवार यांनी गौतम आदानी यांचे कौतुक केले. यापूर्वी सप्टेंबर महिने गौतम आदानी आणि शरद पवार यांची बैठक झाली होती. अहमदाबादमधील अदानी यांच्या घरी ही बैठक झाली होती.

काय म्हणाले शरद पवार

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिनिअरींग कॉलेजच्या रोबोटीक लॅबचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतूक केले. त्यांनी गौतम अदानी यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे इंजिनिअरींग क्षेत्र वेगाने बदलत आहे. यामुळे युवकांनी हा बदल स्वीकारला पाहिजे. देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर आम्ही बारामतीत बनवत आहोत. या योजनेसाठी २५ कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था झाली आहे. यावेळी गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागणार आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी २५ कोटींचा धनादेश पाठवला आहे. फर्स्ट सिफोटेकने दहा कोटी रुपये दिले आहे. या दोघांच्या मदतीमुळे आम्ही हा प्रकल्प साकारु शकत आहोत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments