मराठा समाजाच्या १३ टक्के आरक्षणाचा काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या क्युरेटिव्ह पिटीशनवरून सुनावणी पूर्ण झाली. कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाचा निकालाची प्रतीक्षा आहे क्युरेटिव्ह पिटीशनवरून सुनावणी पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या 13 टक्के आरक्षणाच काय होणार? याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. राज्य सरकार आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या. क्युरेटिव्ह पिटीशनवरून पाच न्यायाधीशाच्या घटनापीठापुढे सरन्यायाधीशाच्या दालनात सुनावणी झाली. 50% मर्यादेचा निकष लावू नये अशी मागणी विनोद यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणार आरक्षण देऊ असं म्हटले ओबीसीतून आरक्षण द्या अशी जरांगेची मागणी आहे.SEBC अंतर्गत शिक्षणात 12 आणि नोकऱ्यांमध्ये दिले 13 टक्के EWS आरक्षण वैध आहे की नाही? इंद्रा सहनी प्रकरणात 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही या निकालाच्या फेरविचाराची गरज आहे का? या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल.